कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान संत बाळूमामा यांच्या बाळूमामा गल्ली, सुभाषनगर
येथील मंदिराच्या कमानीचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

माजी उपमहापौर भुपाल शेटे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद शेटे यांनी आपल्या स्वखर्चातून साकारलेली ही कमान आजपासून लोकांच्या सेवेत आली आहे.
यावेळी दुर्वास कदम, इंदुमती बोर्डिंगचे अध्यक्ष अरुण कुराडे यांच्यासह राजेंद्र साबळे, अजय डोईफोडे ,डॉ. हरीष नांगरे, सुखदेव सातपुते, संजय पोवार, रोहित बागडेकर, शिवाजी पंदारे, बंटी रोटे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
