सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावा : हसन मुश्रीफ

मुंबई : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आढावा बैठक झाली.

 

 

यावर बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

सदर बैठकीस मंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर , आमदार निलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, ऑनलाइनद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.