कोल्हापूर :
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यस्तरावर “भारतीय संविधान गौरव अभियान ” मोठ्या प्रमाणावर राबविले जात आहे. याच धर्तीवर भाजपा कोल्हापूरच्या वतीने कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये भारतीय संविधान गौरव अभियान चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
या अंतर्गत संविधानाचे *स्वातंत्र्य, समता, न्याय, आणि बंधुता या स्तरावरील महत्त्व व महात्म्य* सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचे कार्य विविध माध्यमातून सुरू आहे.
त्यातीलच एक भाग म्हणून शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व्हावी या हेतूने शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यामध्ये कोल्हापूर शहरांतर्गत भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाचे संयोजक डॉ. सदानंद राजवर्धन व अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष अनिल कामत यांच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी श्री आर व्ही कांबळे व शैक्षणिक पर्यवेक्षक सौ.उषा सरदेसाई यांच्या सहकार्याने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .
या स्पर्धेमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या विद्यार्थ्यांचे शहरातील 12 केंद्र स्तरावर प्रत्येकी तीन नंबर काढण्यात आले व पुढे या 12 केंद्रातून अंतिम तीन नंबर व उत्तेजनार्थ पाच नंबर काढण्यात आले.
या चित्रकला स्पर्धेतील केंद्र स्तरावरील बक्षीस वितरण आज बाराही केंद्रावर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच 12 केंद्रातून अंतिम 3 नंबर व 5 उत्तेजनार्थ नंबर यांची बक्षिसे वितरण 26 जानेवारी 2025 रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. केंद्र स्तरावरील बक्षीस वितरणाच्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सदस्य राहुल चिकोडे, संदीप देसाई, संदीप कुंभार, सरचिटणीस डॉ राजवर्धन, जिल्हा कोषाध्यक्ष राजसिंह शेळके, उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, विराज चिखलीकर,आप्पासाहेब उर्फ संतोष लाड , राजू मोरे, अमर साठे, सयाजी आळवेकर ,सौ शितल तिरोके, सौ मंगला निपाणीकर, सौ रीमा पालकर, सौ शिवानी पाटील अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष अनिल कामत ,युवा अध्यक्ष गिरीश साळुंखे , अमेय भालकर , व सर्व सहकारी, मंडल अध्यक्ष प्रदीप उलपे, अभिजीत शिंदे ,सचिन कुलकर्णी, विशाल शिराळकर, सतीश उर्फ आप्पासाहेब घरपणकर, प्रकाश सरनाईक, सुधीर देसाई यासह प्रत्येक मंडलांतील कार्यकर्ते व अनुजा मोर्चा कोल्हापूरचे पदाधिकारी रविकिरण गवळी ,रणजीत औंधकर, राहुल सोनटक्के, प्रशांत अवघडे, सुनील पवार, संभाजी पवार, सचिन घाटगे, निलेश प्रभावळे, प्रवीण शिंदे, सनी आवळे , तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी शांताराम सुतार आणि विद्यार्थी व पालक शहराच्या विविध केंद्रावर बक्षीस वितरणाच्या वेळी उपस्थित होते.