उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीतील यशानंतर प्रथमच कोल्हापुर दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले. याप्रसंगी कोल्हापूर विमानतळावर आमदार राजेश क्षीरसागर व युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी महालक्ष्मीची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.

 

 

 

 

यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, मा.जयश्री चंद्रकांत जाधव,माजी नगरसेवक राहुल चव्हाण, देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे, जिल्हाप्रमुख रवींद्र माने,.उदय सावंत, सत्यजित कदम (नाना), ललीत गांधी आदी उपस्थित होते.