कुंभोज( विनोद शिंगे )
शिरोळ तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर जिल्हा शिंदे गट शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे यांनी भेट घेऊन शिरोळ तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. तसेच विविध प्रश्न संदर्भातील निवेदन त्यांना दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरोळ तालुक्यातील विविध समस्या सोडवण्यासाठी आपण सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असून त्या बाबतीत ते प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना सतीश मलमे यांना दिल्या यावेळी सतीश मलमे यांच्यासोबत शिवसैनिक तसेच शिरोळ तालुक्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार धरशील माने हेही उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज