कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रुकडी येथे होणाऱ्या जैन बांधवांच्या अष्टपाद पंचकल्याण महोत्सवास आज खासदार धैर्यशील माने यांनी पूर्वतयारीची पाहणी केली.
हा महोत्सव यशस्वी करण्याच्या अनुषंगाने महोत्सव समिती व जैन बांधव व रुकडी ग्रामस्थ यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा केली.
यावेळी केंद्रीय महिला आणि बाल विकास कॅबिनेट मंत्री अन्नपूर्णा देवी, खासदार शाहू महाराज, आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने व सर्व ग्रामस्थ तसेच जैन बांधव आदी उपस्थित होते.