कोल्हापूर:कागल तालुक्यातील व्हन्नाळी इथल्या बहादूर वाडकर आणि संदीप वाडकर यांना युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सव्वा लाख रूपये किमतीची मुर्हा जातीची म्हैस भेट दिली. पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे कोलमडलेल्या वाडकर कुटुंबाला कृष्णराज महाडिक यांनी केलेल्या मदतीमुळे कुटुंबासह गांव भारावून गेले. धनंजय महाडिक युवा शक्तिच्या माध्यातून वाडकर कुटुंब महाडिक यांच्याशी जोडलं गेलंय.
महाडिक कुटुंब गरजूला नेहमीच मदतीचा हात देत आलंय. सामाजिक बांधिलकीतून आपण महाडिक घराण्याची ही परंपरा जोपासल्याचं युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं. व्हन्नळी इथं म्हैस भेट देण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
व्हन्नाळी इथं बहादूर वाडकर आणि त्यांचा मुलगा संदीप आपल्या कुटुंबासह राहतोय.बहादूर वाडकर शेतीला जोड व्यवसाय म्हणून म्हैस पालन करतात.बहादूर वाडकर २५ डिसेंबर रोजी गावातील तीन म्हैशींना पाणी पाजण्यासाठी गावच्या ओढयात घेऊन गेले होते. म्हैशी पाण्यात उतरल्यानंतर विजेच्या धक्क्यानं तिन्ही म्हैशींचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळं दुधाचा व्यवसाय करणार्या वाडकर कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. त्यांची दुध विक्री बंद झाल्यामुळं वाडकर कुटुंबावर आर्थिक अरिष्ट कोसळलं होतं. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य संजय वाडकर यांनी खासदार धनंजय महाडिक आणि युथ ऑयकॉन कृष्णराज महाडिक यांना या दुर्घटनेबाबत माहिती दिली. त्यावर कृष्णराज महाडिक यांनी वाडकर कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी कोपार्डे इथल्या जनावरांच्या बाजारातून वाडकर कुटुंबाला भेट देण्यासाठी कृष्णराज महाडिक यांनी सुमारे सव्वा लाख रूपये किमतीची मुर्हा जातीची म्हैस खरेदी केली. सायंकाळी महाडिक यांनी बहादूर वाडकर आणि संदीप वाडकर यांची व्हन्नाळीत जाऊन भेट घेतली. तसंच त्यांच्या गोठयाची त्यांनी पाहणी केली. बहादूर वाडकर आणिं संदीप वाडकर यांनी कृष्णराज महाडिक यांना घडलेल्या अपघाताबाबत माहिती दिली. त्यानंतर कृष्णराज महाडिक यांनी वाडकर कुटुंबाला मुर्हा जातीची म्हैस भेट देऊन सुखद धक्का दिला.
ध्यानी मनी नसताना अचानक कृष्णराज महाडिक यांच्याकडून मुर्हा जातीची म्हैस भेट मिळाल्यामुळं वाडकर कुटुंबियांबरोबर उपस्थित ग्रामस्थही भारावून गेले. महाडिक कुटुंबीयांच्या दानत आणि सामाजिक बांधिलकीची पुन्हा ओळख व्हनाळी वासियांना झाली. यावेळी गावातील सर्व प्रमुख नेते, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि समाजातील लोक एकत्र आले होते.
त्यांनी कृष्णराज महाडिक यांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला. या घटनेमुळं गावात महाडिक कुटुंबीयांविषयी प्रचंड सकारात्मक भावना तयार झाली आहे. दरम्यान संदीप वाडकर हे धनंजय महाडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते आहेत. अपघातात त्यांच्या तीन म्हैंशीचा मृत्यू झाल्यानं त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. त्यामुळं आपल्या सोशल मिडियातून मिळणार्या उत्पन्नातून त्यांच्यासाठी आपण म्हैस घेऊन आलोय.त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहून आपल्यालाही आनंद झाल्याचं कृष्णराज महाडिक यांनी बोलताना सांगितलं.
कृष्णराज महाडिक यांनी म्हैस भेट दिल्यानं आपला दुधाचा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याचं सांगताना बहादूर वाडकर यांना अश्रू आवरता आले नाहीत. कृ
ष्णराज महाडिक यांचे ॠण फिटणार नसल्याची भावना वाडकर यांनी व्यक्त केली. यावेळी दिनकर वाडकर, ़एम.टी.पोवार आणि नामदेव बल्लाळ यांनी कृष्णराज महाडिक यांच्या कृतीचं कौतुक केलं. यावेळी युवा शक्तीचे विनायक भोसले ़सतीश लोंढे, ़विनायक गुरव, यांच्यासह संजय वाडकर, ़दिनकर वाडकर, ़श्रीपती वाडकर, ऱंगराव वाडकर, ़प्रभाकर पाटील, ़अदित्य वाडकर, ़विशाल मेथे, ज़गदीश वाडकर, ़शामराव दंडवते, ़भगवान शेटके, ़सुजय पाटील, ग़ुरूदास गुरव, ़विशाल कांबळे, ़विजय लोकरे, ऱोहन लोंढे, ़उत्कर्ष घुगरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.