आ.अमल महाडिक यांनी सांगवडेतील जकुबाई उत्सवाला दिली भेट

कोल्हापूर: आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सांगवडेवाडी गावातील जकुबाई देवीच्या उत्सवाला भेट दिली. श्री नरसिंह देवाची बहीण म्हणून जकुबाई देवीची पूजा केली जाते. देवीला सिंहासन आणि चांदीचा नवीन मुखवटा भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी आमदार पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार महाडिक यांचा सत्कार केला. गावातील पात्र लाभार्थी महिलांना मोफत उज्वला गॅस कनेक्शन वाटपाचा कार्यक्रम अमल महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच भाजपा सदस्य नोंदणी अभियानही पार पडले. यावेळी मा.उपसरपंच प्रकाश खुडे, किशोर शिंदे,सचिन गणमाळे,दादासो खोत, विशाल चव्हाण,सागर हुजरे, सुरेश पाटील, तानाजी पाटील, धोंडिराम कोकरे, प्रल्हाद खुडे, राजू माने,सुंदर हुजरे, युवराज हूजरे यांच्यासह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706