कोल्हापूर: जैन धर्मातील सर्वश्रेष्ठ साधू चरित्र चक्रवर्ती प्रथम आचार्य 108 श्री शांतीसागर महाराजांना भारत सरकारने सर्वोच्च असा “भारतरत्न “ पुरस्कार देवून गौरव करण्यात यावा. या पुरस्काराने देशभरातील जैन समाजाला प्रेरणा मिळणार असून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव होणार असल्याने राज्य सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी नांदणी पंचकल्याण महोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली.


त्याबरोबरच नांदणी येथील अतिशय तिर्थक्षेत्रास “अ “वर्गाचा दर्जा देण्याची मागणी देखील करण्यात आली. या मठांच्या अधिपत्याखालील ७४० गावांचा जैन समाजातील पुरातन मठ आहे. नांदणी मठाचा इतिहास हा इ. स. ८५७ पेक्षा पूर्वीचा असून, उपलब्ध कागदपत्रांवरून नांदणी मठाची उत्पत्ती ७०१ पासूनची आहे. या पीठाचे पहिले आचार्य श्री. जिनसेन महाराज हे होते. या मठाचे मठाधिपती म्हणजे भट्टारक महाराज हे त्या मठाचे राजे आहेत. वरील सर्व गावांचा कारभार या मठातून चालत असल्याने या तिर्थक्षेत्रास “ अ “वर्गाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली.
वरील दोन्ही मागणीबाबत राज्याचे मुख्यमंत्री सकारात्मकता दर्शवित लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे धर्मसभेस संबोधित करताना बोलले. परमपुज्य आचार्य १०८ विशुध्दसागर महाराज संसंघ , स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी , राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ , आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मा. आमदार प्रकाश आवाडे , आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर , आमदार राहूल आवाडे , आमदार सुरेश खाडे , आमदार अमल महाडिक ,आमदार अशोकराव माने ,जिल्हाधिकारी अमोल येडगे , महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष सागर शंभुशेटे यांचेसह लोकप्रतिनिधी ऊपस्थित होते.
