कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या केंद्र कार्यालयात आमदार हसन मुश्रीफ यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. हा सत्कार बँकेचे उपाध्यक्ष व माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते झाला.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँक ही सहकारातील माझी मातृसंस्था आहे. माझ्या 35 – 40 वर्षाच्या राजकीय व सामाजिक जीवनाच्या जडणघडणीत केडीसीसी बँकेचा सिंहाचा वाटा आहे. आज महाराष्ट्राच्या पटलावर मंत्री म्हणून काम करत असताना या बँकेचा अध्यक्ष असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
यावेळी संचालक मंडळातील उपाध्यक्ष व माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार संजयबाबा घाटगे, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुन्शी आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.