दिल्ली: २६ जानेवारी २०२५ रोजी राजपथ म्हणजेच कर्तव्यपथावरील प्रतिष्ठेच्या संचलनासाठी यंदा १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले. या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेले नाही.
प्रत्येक राज्याला तीन वर्षांतून एकदा तरी चित्ररथ सादर करण्याची संधी मिळेल, असा नियम संरक्षण मंत्रालयाने या वर्षी केला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या तज्ज्ञांच्या समितीच्या पसंतीला चित्ररथ उतरला पाहिजे, हीदेखील नियमाची आणखी एक अट आहे
प्रजासत्ताक दिन २०२५ च्या संचलनात सहभागी होण्यास मिझोराम आणि सिक्कीमने असमर्थता दर्शवली. अंदमान आणि निकोबार; तसेच लक्षद्वीपचे अधिकारी तज्ज्ञ समितीच्या बैठकीला गैरहजर राहिले. या राज्यांऐवजी आता गुजरात व उत्तर प्रदेशसह आंध्र प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना संधी देण्यात आली आहे. यात तूर्त महाराष्ट्राचा समावेश नाही.
कोणकोणत्या राज्यांचे चित्ररथ?
गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि हरियाणा.