धनगरवाडी, आरे येथील शिवसैनिकांकडून आ.चंद्रदीप नरके यांचा सत्कार

 

कोल्हापूर: हरेश्वर माध्यमिक विद्यालय, हरेश्वर विकास सेवा संस्था, बाजीराव पाटील विकास सेवा संस्था, ज्योतिर्लिंग दूध संस्था, महालक्ष्मी दूध संस्था, महात्मा फुले दूध संस्था, शिवपार्वती दूध संस्था, बिरदेव दूध संस्था, हिंदवी स्वराज्य संघ आरे ,धनगरवाडी, आरे येथील सर्व शिवसैनिक नरके प्रेमी व ग्रामस्थ यांच्यामार्फत चंद्रदीप नरके यांची आमदार पदी निवडीबाबत जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

 

चंद्रदीप नरके यांनी यथोचित सन्मानाबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी जय महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कोल्हापूर यांच्यामार्फत संसार सेट वाटप कार्यक्रम देखील पार पडला. 185 लोकांना संसार सेट वाटप करण्यात आले.

यावेळी अजित नरकेसो, हंबीरराव पाटील, महेश वरुटे, रमेश वरुटे, सुरेश चौगुले, श्रीपती पाटील, अजित पाटील (हसुर), सुवित पाटील, किशोर पाटील, उत्तम वरुटे, दादासो लाड, विक्रांत पाटील (सडोली), मोहक पाटील, राजू पाटील (हसुर), नामदेव बामणीकर, दिलीप कांबळे, हरिदास मोहिते, मधुकर ढाले, भास्कर कुबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

एकनाथ गुरवसो हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर कार्यक्रम संयोजनामध्ये, शिवाजी निवृत्ती वरुटे, राजवर्धन महेश वरुटे, बबन चौगुले यांची महत्वाची भूमिका होती.

याचबरोबर आरे आणि परिसरातील विविध सामाजिक राजकीय व सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, पत्रकार बंधू,   कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.