नागपूर हिवाळी अधिवेशनाचा समारोप

नागपूरनागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२४ चा आज समारोप झाला. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली.

 

 

सहा दिवस चाललेल्या या अधिवेशनात एकूण १७ विधेयके संमत करण्यात आली, तर एक विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींची निवड देखील करण्यात आली. विदर्भात घेतलेल्या या अधिवेशनात विदर्भातील शेतकरी, कष्टकरी तसेच येथील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारने केला. राज्य सरकारने आता गतीने कामाला सुरुवात केली असून महाराष्ट्र आता थांबणार नाही, तर सर्वांगीण प्रगती करेल हेच या अधिवेशनाने दाखवून दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

यानंतर मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती, उपसभापती आणि मंत्रिमंडळातील इतर सहकारी सदस्यांच्या साथीने चहापानाचा आस्वाद घेतला.