कुंभोज (विनोद शिंगे)
दानोळी परिसर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै . महानकार्यचे कवठेसार प्रतिनिधी संदीप नांद्रेकर तर उपाध्यक्षपदी दै . पुण्यनगरीचे निमशिरगाव प्रतिनिधी गोमटेश पाटील आणि सचिव पदी दै . लोकनेता कोथळी प्रतिनिधी निखिल विभूते व खजिनदारपदी दै . महानकार्याचे चिपरी प्रतिनिधी रमेश चव्हाण यांची एक मताने निवड करण्यात आली.
निवडीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष दै . महानकार्यचे कोथळी प्रतिनिधी सुभाष इंगळे होते .निवडी संदर्भात घेण्यात आलेली विशेष बैठक जैनापुर येथील सभागृहात संपन्न झाली .निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला . यावेळी राजकुमार चौगुले , युवराज पाटील , मनोजकुमार शिंदे , रोहित तवंदकर ,सुरेश असगेकर, नवनाथ गावडे, हरिश्चंद्र पिसे ,लंकेश कांबळे , विजयराज जगदाळे , जनगोंडा पाराज आदींसह संघातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते . स्वागत संपादक अभय वाळकुंजे यांनी तर आभार संपादक जमीर मुजावर यांनी मांनले .