कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मंजूर करून आणलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून विविध प्रभागांमध्ये रस्ते आणि गटारींच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे .
खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून काही रस्ते पूर्ण झाले आहेत. तर काही रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. कृष्णराज महाडिक यांनी आजी-माजी नगरसेवक आणि भाजपच्या पदाधिकार्यांसह झालेल्या रस्त्यांची पाहणी केली. तसेच नव्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभही केला.
कोल्हापुरातील रस्त्यांच्या अवस्थेबाबत बोलण्यासारखी स्थिती राहीलेली नाही. त्यामुळे शहरातील रस्ते टकाटक व्हावेत, वाहनधारकांना प्रवास करताना कोणताही त्रास होवू नये, या हेतूने खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णराज महाडिक यांनी राज्य सरकारकडून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून काही प्रभागातील रस्ते पूर्ण झाले आहेत. तर काही रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. कृष्णराज महाडिक यांनी शहरात प्रत्येक प्रभागात फिरून रस्त्यांच्या कामाची माहिती घेतली. पुर्ण झालेल्या कामाच्या दर्जाचीही तपासणी त्यांनी केली. तर अनेक प्रभागातील रस्त्यांच्या आणि गटारीच्या कामांचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत झाला. प्रभाग क्रमांक ३९ राजारामपुरी एक्सटेंशन अंतर्गत मंडलिक पार ते भाटघर गटर चॅनलच्या कामासाठी १५ लाख रुपये मंजुर झाले आहेत आणि राजारामपुरी एक्सटेंशन परिसरात गटार चॅनल तसंच रस्ता डांबरीकरणासाठी ३५ लाख रुपये मंजूर आहेत. त्याचप्रमाणं गंगातीर्थ रस्ता डांबरीकरणासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. त्याचा शुभारंभ कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते आणि प्रा. जयंत पाटील, विलास वास्कर, राजसिंह शेळके, भाग्यश्र्ी शेटके, किरण नकाते, करण जाधव, अभिजीत शिंदे, उमा इंगळे, शैलेश पाटील, राहुल जोशी, विराज चिखलीकर, अमर साठे, संगीता खाडे, गिरीश साळोखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होणार असून गटार व्यवस्थेसह रस्त्याचे डांबरीकरण होवून, रहदारी सुरळीत होईल, असे कृष्णराज महाडिक म्हणाले. तर प्रभाग क्र. ३४ शिवाजी उद्यम नगर अंतर्गत मूलभूत सुविधांच्या विकासासाठी २५ लाख रुपये निधी देण्यात आलाय. त्यातून या परिसरातील गटारींचे बांधकाम होणार आहे. त्याचाही शुभारंभ करण्यात आला.
यावेळी अजित मोरे, मोहन जाधव, अक्षय शिंदे, बाळासाहेब मुधोळकर आणि प्रणित व्हनाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ३८ टाकाळा खण, माळी कॉलनीतील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झालाय. त्यामध्ये परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. तसंच म्हसोबा मंदिर ते राजमंदिर आईस्क्रीम आणि शिंदे घर पर्यंत ९ इंची गटर बांधणीसाठी २० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. त्याचाही शुभारंभ करण्यात आला. यावेळी करण जाधव, अविनाश भोसले, अभिजीत भोसले, मयूर माने, चेतन शहा, स्वप्नील कुंदनकर, जयराज देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्याचप्रमाणं यादव नगरमधील अंतर्गत कॉलन्यातील विविध ठिकाणी गटार बांधकामासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. त्याचा शुभारंभ विशेष कार्यकारी अधिकारी प्रेमसिंग रजपूत, रविकिरण गवळी, सुरज पाटील, संदिप साठे, नितीन पाटील, अभिषेक सूर्यवंशी, नागेश पोवार, अर्जुन दिंडे, निलेश पाटील, सत्यम चौगुले, रणजित औंधकर, चौधरी भाई मुजावर, शिवराज रजपूत, मंगलताई निपाणीकर, साजिद मुल्ला, पप्या पाटील यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
यादवनगरमधील रस्त्यांच्या कामाबाबत तिथल्या नागरिकांशी भारतीय बैठक मारून कृष्णराज महाडिक यांनी चर्चा केली. या निधीमुळं यादव नगर परिसरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान प्रभाग क्रमांक ४७ फिरंगाई अंतर्गत फिरंगाई तालीम जवळील परिसरात गटार बांधकामासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ उत्तम कोराणे, सचिन पवार, विश्वास पवार, गिरीश साळुंखे, प्रकाश सरनाईक, संग्राम जरग, मनोज निकम, बळी भोसले, सतीश तेलके, सतीश पाटील, अभिजीत गायकवाड, इंद्रजीत महाडेश्वर आणि चेतन साळुंखे यांच्या उपस्थितीत झाला. तर प्रभाग क्रमांक ६ पोलीस लाईन परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी १५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. तर कसबा बावडयातील अंतर्गत बिरंजे पाणंद शाहू सर्कल परिसरात गटर बांधण्यासाठी २० लाख रुपये निधी मंजूर केला आहे. त्याचा शुभारंभ किरण शिराळे, चंद्रकांत घाडगे, प्रदीप उलपे, सचिन पवार, धीरज उलपे, किसन खोत, अमर साठे, प्रदीप मगदूम, रावसाहेब चौगुले, किशोर पवार, संतोष जाधव, बाबा चव्हाण, रावसाहेब चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होत. राजेंद्रनगर प्रभाग क्र. ६५ मधील श्रीराम किराणा स्टोअर्स ते श्रीकांत पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्याचा शुभारंभ संग्राम निकम, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम, नामदेव नागटिळे, सुखदेव बुध्याळकर, शिवनाथ सगट, दत्ता लोखंडे, महादेव बिरजे, प्रसाद पाटोळे, बंकट सूर्यवंशी, राम नागटिळे, दीपक नागटिळे, राहुल सोनटक्के, भिकाजी सोनटक्के यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
एकूणच शहरातील रस्ते आणि गटारी यांचा दर्जा सुधारून शहरवासियांना उत्तम पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी यापुढंही कार्यरत राहू, असं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं.
कृष्णराज महाडिक हे नेहमीच सर्वसामान्यांच्या सुख दुःखाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. सामान्यांचा दिनक्रम, त्यांचा व्यवसाय, त्यात येणार्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. रस्ते बांधणी प्रकल्प कामाच्या शुभारंभावेळी रोडरोलर स्वतः चालवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार रोडरोलर चालवत त्यांनी रस्ते डांबरीकरणाच्या कामाचा अनुभव घेतला. तर यादवनगरमध्ये सर्वसामान्य नागरिक आणि महिलांसोबत बसून तिथल्या पायाभूत सुविधांबाबतच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या