केजरीवाल यांचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र

मुंबई: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एनडीएतील घटक पक्ष असलेल्या जदयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहिले आहे. भाजपची साथ सोडण्याचा मेसेज या पत्रातून दिला आहे.

 

 

 

अरविंद केजरीवाल यांनी पत्रात म्हटलं आहे की, हे पत्र मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात लिहीत आहे. तो केवळ संविधानाशीच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानाची संबंधित आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल केलेल्या आंबेडकर आंबेडकर बोलन आजकाल फॅशन झाले हे त्यांचे वक्तव्य अवमानजनक नाही तर भाजपचा बाबासाहेब आणि संविधानाकडे बघण्याचा दृष्टिकोनही उघड करतो.असं या पत्रात म्हटले आहे.

ज्यांनी भारताचे संविधान लिहिले आणि समाजातील सर्वात वंचित घटकांना अधिकार मिळवून देण्याचे स्वप्न बघितले, त्यांच्याबद्दल असं म्हणण्यास धाडस भाजपने कसं केलं, यामुळे देशभरात लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पंतप्रधानांनी अमित शहा यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. लोकांना वाटू लागले आहे की, बाबासाहेबांच्या अनुयायांनी आता भाजपचे समर्थन करू शकत नाही, असे म्हणत अरविंद केजरीवाल आणि अप्रत्यक्षपणे भाजपची साथ सोडण्याचा मेसेज नितीश कुमार यांना दिला आहे.