मुंबई : भाजपचे आमदार राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राम शिंदे यांनी विधान परिषद सभापती पदासाठी बुधवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राम शिंदे यांच्या निवडीची घोषणा आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत राम शिंदे यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी त्यांची सभागृहांने एकमताने निवड केल्याबद्दल विरोधी पक्षाच्या सदस्यासह सर्व सदस्यांचे आभार मानले.