मुंबई: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष पदासाठी प्रवीण दरेकर आणि रवींद्र चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. काल भाजप नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजप प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात प्रवीण दरेकर यांना मंत्री पद नाकारल्यानंतर आता त्यांची भाजप प्रदेश अध्यक्ष पदासाठी चर्चा होत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
ते आता राज्याचे मंत्री झाले आहेत त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यासह प्रवीण दरेकर यांची नाव समोर आल्यामुळे या पदासाठी शर्यत वाढली असून, भाजपची हे पद आहेत कोणाला मिळणार, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.