मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला फार मोठा फटका बसल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाअर्जुन खरगे यांना लिहिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी फारच घसरली. याची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी लिहिलेल्या पत्रात नाना पटोले यांनी मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर चार वर्षे पूर्ण झाले असून काँग्रेस कमिटी बरखास्त करावी. तसेच नवीन कमिटी स्थापन करून मला या पदातून मुक्त करावे असे लिहिल्याचे समोर येत आहे.