उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या मुंबईतील आणि महानगरातील खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची गुरुवारी मुंबईतील रामटेक बंगल्यावर विशेष बैठक पार पडली.

 

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व नवनिर्वाचित आमदार, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करत आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक महायुती म्हणून सक्षमपणे लढून विजयी होण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन देखील यासमयी केले. तसेच गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत आपल्या सरकारने मुंबईत राबविलेले अनेक महत्वकांक्षी प्रकल्प, निर्णय सर्व शिवसैनिकांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवावे असे आवाहन ही मी यावेळी सर्वांशी संवाद साधताना केले. तत्पूर्वी शिवसेनेचे दिवंगत विभागप्रमुख विजय दिवार आणि ठाणे येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांना शिवसेना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, आनंदराव अडसूळ,खासदार श्रीकांत शिंदे, महिला नेत्या मीनाताई कांबळी, खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, खासदार मिलिंद देवरा, आमदार दीपक केसरकर, माजी खासदार राहुल शेवाळे,शिवसेना प्रवक्ते संजय निरूपम तसेच शिवसेनेचे सर्व सहकारी आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545