मुंबई: रिझर्व बँक ऑफ इंडिया ला धमकीचा मेल आला असून या मेलमध्ये बँकेला स्फोटकानी उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आरबीआय अधिकाऱ्यांच्या मेल आयडीवर रशियन भाषेतील ई-मेल आला आहे.हा मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून, मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या कस्टमर केअर विभागाला याआधीही नोव्हेंबरमध्ये धमकीचा फोन आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपण लष्कर- ए- तैयबाचे सीईओ असल्याचे सांगितले होते. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मागचा रस्ता बंद करा इलेक्ट्रिक कार खराब झाली आहे,असे सांगून फोन बंद केला होता.