कुभोज (विनोद शिंगे)
नरंदे तालुका हातकलंगले येथील गट क्रमांक दोनशे अठरा मधील दहा हजार चौरस जागेत बंदिस्त हॉल व कंपाऊंड बांधकाम थांबवण्यासाठी आज नरंदे ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी गेले असताना सदर जागेवरती बांधकाम करत असणारे नागनाथ इज्जस्टेशन सोसायटीचे संचालक हर्षवर्धन देशमुख ,नमिता देशमुख , चेअरमन प्रतापराव देशमुख व अन्य शिक्षक सहकारी यांनी शिवीगाळ केली असल्याची तक्रार आज ग्रामपंचायतीच्या सर्व महिला सदस्यांनी हातकणंगले पोलीस स्टेशन येथे निवेदनाव्दारे केली. यावेळी सरपंच सौ पूजा करणे यांनी हातकणंगले पोलिसांना निवेदन दिले तसेच हातकणंगले तहसीलदार व हातकणगले पोलीस निरीक्षक यांना सदर प्रश्नी तात्काळ लक्ष घालण्याची विनंती केली.
सदर घटनास्थळी संतप्त नागरिकांनी आज चालू असलेले बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळी झालेल्या वादविवादात काही प्रमाणात सदर बांधकाम पाडण्यात आले, सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन हातकणगले विधानसभेचे विद्यमान आमदार अशोकरावजी माने यांनी आपल्या सूतगिरणीवर तहसीलदार व पोलीस निरीक्षक व नरंदे ग्रामस्थांची तात्काळ बैठक बनवून सदर प्रश्न तात्काळ सोडवण्यात साठी प्रयत्न केले.
परिणामी यासाठी शासकीय दरबारी लवकरात लवकर बैठक लावून सदर प्रश्न निकाली काढला जाईल असे आश्वासन ही यावेळी विद्यमान आमदार अशोकरावजी माने यांनी दिले. यावेळी नंरदे ग्रामस्थांच्या वतीने हातकणंगले तहसीलदार पोलीस निरीक्षक व जिल्हाधिकारी तसेच विद्यमान आमदार यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालून नरंदे ग्रामस्थांचा असणारा भावनेचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा व सदर जागेवरती सुरू असलेली बांधकाम कायमस्वरूपी थांबवावे अशी मागणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात नरंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.