कोल्हापूर: धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सहभागी महिलांना अनघा पुरंदरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कोल्हापूर आर्ट अँड कल्चरच्या अध्यक्षा सौ. वैष्णवी महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
अनघा पुरंदरे यांनी त्यांच्या पतीच्या साथीने आदिवासी भागात असणाऱ्या महिलांसाठी खूप चांगले काम केले आहे. पारंपरिक जंगली जीवन जगणाऱ्या आदिवासींचा जंगलच्या मेव्यावर उदरनिर्वाह सुरू होता. त्यांना विविध व्यवसायांच प्रशिक्षण देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधली. प्रचंड परिश्रम करणाऱ्या या घटकामुळ निसर्ग, पर्यावरण रक्षणासोबतच पर्यावरण पूरक वस्तूंची निर्मिती होत आहे. त्यांच्या या कामाचा अनुभव आणि मार्गदर्शन भागीरथी महिला संस्थेच्या सदस्यांना व्हावा, या उद्देशाने सौ. अरुंधती महाडिक यांनी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.
महिलांनी दैनंदिन जीवन जगत असताना पर्यावरणपूरक वस्तू तयार करून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. त्या व्यवसायामधून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, स्वतःसह आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करावे, असे मत यावेळी पुरंदरे यांनी व्यक्त केले.
सहभागी झालेल्या महिलांना वेगवेगळ्या व्यवसायाबद्दल प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. याबद्दल सहभागी झालेल्या महिलांनी मा. पुरंदरे मॅडम व भागीरथी महिला संस्थेचे आभार मानले.
यावेळी बी. एस. शिंपूकडे, भारती नायक, प्रतिभा शिंपुकडे, प्रिया चिवटे, शिवानी पाटील, शितल तिरुके, शारदा पोटे, सुलोचना नार्वेकर, दीपा पाटील, सीमा पालकर, रोहिणी वाडकर, सारिका लिगाडे, भाग्यश्री परीट, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.