कोल्हापूर : कोल्हापूर येथील महाराणा प्रताप चौकामध्ये पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान दगडफेक झाली. यामध्ये दगड डोक्याला लागल्याने दोघेजण जखमी झाले आहेत. अर्ध्या तासाहून अधिक वेळ ही दगडफेक सुरू होती. पोलिसांनी हा वाद मिटवला. या घटनेमध्ये एक महिला जखमी झाली असून, त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराणा प्रताप चौकामध्ये दोन गटांमध्ये गेल्या काही वर्षापासून वाद सुरू आहे. रविवारी रात्री या दोन्ही गटातील वाद उफाळून आला . या गटातील लोकांनी एकमेकांवर दगड आणि विटा फेकल्या. यामध्ये महिलेच्या डोक्याला तर एका तरुणाच्या तोंडावर दगड लागला. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी लाठीचार्ज केला. व पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.