मुंबई: महाविकास आघाडीची समाजवादी पार्टीने साथ सोडली आहे. शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार अबू असीम आझमी यांनी ही घोषणा केली आहे.

अबू आझमी म्हणाले , महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांच्या मंचावर प्रचारासाठी दिसले नाहीत, जागा वाटपा वेळी ही रस्सीखेच पाहायला मिळाली. यामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे.
अब आझमी यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ही निवडणूक हरल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आमचा हिंदुत्वाचा मुद्दा कायम असेल. सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचा विचार उद्धव ठाकरे यांनी मांडला नाही त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला आमचा विरोध आहे. असे आझमी म्हणाले.
आज महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली नाही. पण अबु आझमी यांनी मात्र विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत फूट पडली आहे.
