सांगली जिल्ह्यातील घानवडच्या माजी उपसरपंचाचा खून

कोल्हापूर: घानवड (ता. खानापूर, जि.सांगली) येथील घानवडच्या माजी उपसरपंचाचा गार्डी ते नेवरी रस्त्यावर गुरुवारी दुपारी गळा चिरून खून केल्याची घटना घडली. बापूराव देवाप्पा चव्हाण (वय 47) असे त्यांचे नाव आहे.

 

 

बापूराव चव्हाण हे पोल्ट्री व सराफ व्यावसायिक होते. गार्डी नेवरी रस्त्यावर रस्त्यापासून काही अंतरावर त्यांचे पोल्ट्री शेड आहे. गुरुवारी दुपारी ते घानवड येथून दुचाकीवरून आपल्या पोल्ट्री शेड कडे निघाले होते, अज्ञातांनी अडवून त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामुळे त्यांचा जागीस मृत्यू झाला.

हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस पथके नियुक्त करण्यात आले आहे. सांगली येथील ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले असून, श्वान मृतदेह नजिकच घुटमळले . घटनास्थळी सांगली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलीस पथक परिसरात हल्लेखोरांचा शोध घेत होते. मात्र खून कोणी केला याबाबत पोलिसांच्या हाती काही धागेदोरे मिळालेले नाहीत.