कोल्हापूर:कोट्याधीश होण्यासाठी जनतेच्या हिताचे विस्मरण करून विकासकांच्या तत्वांना बाजूला ठेवून स्वतःच्या फायद्यासाठी सत्तेचा वापर करणाऱ्या पोस्टरबाज आमदार आबिटकरांना राधानगरीची जनता धडा शिकवेल असा घणाघात महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी .पाटील यांनी केला.
ते कडगाव ता. भुदरगड येथे आयोजित मेळाव्या प्रसंगी बोलत होते यावेळी पश्चिम भुदरगडचे बिद्रीचे संचालक धनाजीराव देसाई होते .स्वागत व प्रस्ताविक विलासराव कांबळे यांनी केले .
यावेळी के.पी.पाटील बोलताना पुढे म्हणाले जनतेचे हित हा केवळ भास ठेवून वैयक्तिक फायद्यासाठी जनतेचा वापर केला मतदारसंघात विकास कामासाठी भरीव स्वरूपाचा निधी आणल्याच्या कांगावा करत कागदावरच निधी खर्च झाल्याचे चित्र आहे विकास निधीचा वापर जनतेच्या हितासाठी किती ? व स्वतःसाठी किती ? याचा अनुभव आत्ता राधानगरीची जनता घेत आहे स्वतःच्या फायद्यासाठी जनतेचा वापर करणाऱ्या व मतदार संघात निव्वळ पोस्टरबाजी करणाऱ्या गद्दारांला आता धडा शिकवण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे असे आवाहन केले.
यावेळी धनाजीराव देसाई बोलताना म्हणाले राधानगरी मतदारसंघाचा रचनात्मक विकास करण्याचे व्हिजन असणारी के.पी. पाटील हे कर्तव्यदक्ष व कर्तृत्व संपन्न असणारे नेतृत्व आहे. मतदारसंघात महत्त्वाचे असणारे घाट ,रस्ता, जलसिंचन ,पर्यटन , गडकिल्ले संवर्धन असे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत अशा प्रश्नांना पूर्णविराम देण्यासाठी महाविकास आघाडीच्या मशाल चिन्हाला साथ देऊन के. पी. पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. यावेळी के.ना. पाटील काशिनाथ देसाई मुबारक शेख आदींची मनोगत झाली.
यावेळी काका देसाई,सुभाष सोनार, बाळासाहेब भालेकर, प्रकाश डेळेकर, आनंदराव देसाई,मोतेश बारदेस्कर, अरुण देसाई,दत्ताआणा देसाई शिवाजीराव देसाई के.एन. पाटील रामदास देसाई धनाजी पाटील शिवाजी निकाडे आदीसह पश्चिम भुदरगड मधील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राधानगरी मतदार संघाचा मुड
के.पी. साठी गुड ! “”
गेल्या दहा वर्षात विकास कामाच्या नावाखाली खरा विकास कोणाचा झाला हे राधानगरीच्या जनतेने चांगलेच अनुभवले आता मशालच नवी क्रांती करणार असल्याचे चित्र सगळीकडे दिसते म्हणूनच राधानगरी मतदारसंघाचा मुड के .पी.पाटील साठी गुड असल्याचे काशिनाथ देसाई म्हणतात एकच दाद मिळाली