हातकणंगले सह कोल्हापूर जिल्ह्यात ताकदीने लढणार-वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच शिरोळ विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीसह हातकणंगले व जिल्ह्यातील काही जागा ताकतीने लढवणार,असे प्रसिद्धीपत्रक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांनी प्रसिद्धीस दिले आहे .

 

 

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,हातकणंगले मतदारसंघ राखीव मतदार संघ आहे पण या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आजवर आंबेडकर विचाराच्या उमेदवाराने कधी केले नाही.इथल्या उमेदवाराने प्रस्थापित राजकीय पक्षांची विचारधारा स्वीकारून गुलामी ची मानसिकता निर्माण करण्याचे काम केले आहे. यावेळी मात्र वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंबेडकरी विचाराचा प्रतिनिधी निवडून देऊन ही गुलामी संपविण्याचा निर्धार या प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

हातकणंगले साठी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने एक टॅग लाईन बनविण्यात आले आहे., बस झाला पराभव ! ‘ वंचित का अब एक कदम जीत की और’. अशी ती टॅग लाईन आहे.दोनच दिवसात तालुक्यातील सर्व र्विंगच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा,कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल ,असेही या पत्रकात म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकावर जिल्हाध्यक्ष कदम यांच्यासह महासचिव सिद्धार्थ कांबळे सचिव अरुण जमणे, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, भीमराव संघमित्रा, दामाजी जाधव ,यांच्यासह हातकणंगले तालुक्याचे अध्यक्ष जे के गायकवाड व महासचिव संजय भोसले यांच्या सह्या आहेत.

🤙 9921334545