वडगाव मधील ४२ विषबाधित नागरिकांची नविद मुश्रीफ यांनी केली विचारपूस

कोल्हापूर:वडगाव (ता. कागल) येथील नागरिकांमध्ये उलट्याची गेल्या शनिवारपासून लागण झाली. शुक्रवारी (ता. ११) नवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी प्रसाद म्हणून केलेल्या दूध-सरबत यातून ४२ रुग्णांना ही विषबाधा झाली. आठ रुग्ण गडहिंग्लज आणि निपाणी येथे खासगी रुग्णालयात सेनापती कापशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३४ रुग्णांवर सलाईन, औषधे असे उपचार घेत होते. यातील काही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

 

 सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक   नविद मुश्रीफ यांनी प्रत्येक रुग्णांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय सहकार्य असल्यास मुश्रीफ कुटुंबीय सदैव आपल्या सोबत असेल असा प्रत्येक रुग्णांना शब्द दिला. तसेच वडगाव ग्रामपंचायतला भेट देत योग्य त्या संदर्भात चर्चा केली. औषधोपचारांची माहिती घेतली.

यावेळी एकनाथ पाटील, अजित गुरव, रवींद्र दिवटणकर, प्रकाश शिंदे, सुरज मोरे, दिपक मोरे, आनंद आडाव, प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.