कोल्हापूर (संग्राम पाटील)
भारतीय दलित महासंघाच्या वतीने बांबवडे ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर याठिकाणी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदरच्या सोहळ्याप्रसंगी दीपप्रज्वलन शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे व प्रतिमापूजन प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
पंचशील, बुद्ध वंदना व धम्म विधि भारतीय बौद्ध सभेचे बौद्धाचार्य प्रकाश कांबळे, सचिन कांबळे, दीपक कांबळे, राजेश शिवजातक यांनी केले. सदरच्या कार्यक्रमास उपस्थित भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे , सांगली जिल्हा अध्यक्ष दयानंद शिवजातक, शाहूवाडी तालुका अध्यक्ष आकाश कांबळे, बांबवडे गावचे माजी लोकनियुक्त सरपंच सागर कांबळे, विद्यमान सरपंच भगतसिंग चौगुले,सोमवार पेठ चे सरपंच विजय सावंत, बांबवडे ग्रामपंचायत सदस्य सुरेश नारकर सचिन कांबळे, प्रदीपसिंह माने, बापू कांबळे, विजय लोखंडे, भिकाजी कांबळे, प्रज्ञावंत कांबळे, किरण कांबळे,मंगल वाघमारे, लता अडसूळ, मीना कांबळे,तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.