हातकणंगले विधानसभेची जागा शिवसेनेचीच- जिल्हाप्रमुख संजय चौगुले

कुंभोज  ( विनोद शिंगे)

हातकणंगले विधानसभेची जागा ही शिवसेनेचीच आणि ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच रहावी यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले.

 

 

विधानसभा 2024 ची निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या अनुषंगाने आज मिणचे येथे शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा तसेच सोशलमीडिया वापरा संदर्भातील मार्गदर्शन शिबिराचे* आयोजन हातकणंगले विधानसभेचे मा. आम. डॉ. सुजित मिणचेकर साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले होते. यावेळी बोलताना, हातकणंगले विधानसभेच्या जागेवर आजपर्यंत शिवसेना लढली आहे आणि ही जागा जिंकली सुद्धा आहे, त्यामुळे शिवसैनिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये कारण हातकणंगलेची जागा ही शिवसेनेचीच होती, आहे आणि भविष्यात देखील ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच राहणार आणि यासाठी लागेल ते शर्थीचे प्रयत्न करण्याची ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिली.

या संवाद मेळाव्यादरम्यान अनेक मान्यवरांची व पदाधिकाऱ्यांची मनोगते झाली, यामध्ये मा. जि.प. सदस्य महेशभाऊ चव्हाण, मा.जि.प. सदस्य व सभापती प्रवीणजी यादव, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यामध्ये प्रामुख्याने हातकणंगलेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आमदार हातकणंगलेतून निवडून जाणार यात तीळमात्र शंका नसल्याच्या भावना व्यक्त केल्या.

या मेळाव्यास व्यासपीठावर मा. पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदूम, उपतालुकाप्रमुख बाबासाहेब शिंगे, विजय भोसले, संदीप दबडे, उदय शिंदे तसेच इतर सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706