कागल ते पेठनाका राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कामांना शंभर कोटी मंजूर – खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर : शालेय विद्यार्थी व नागरिक यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची मागणी केली होती.यावेळी खासदार माने यांनी संबंधित रस्त्याची पाहणी विद्यार्थी , शेतकरी, नागरिक यांच्या समवेत केली होती .यावेळी सदर मागणी उचित असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी दिली होती.

 

दरम्यान,सदर कामासाठी त्यांनी देशाचे रस्ते व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे खासदार माने यांनी नवीन कामे समाविष्ट करण्याबाबत मागणी करून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.अखेर खासदार माने यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ कागल ते पेठनाका दरम्यानच्या रस्त्यावर भुयारी मार्गाचे व सेवा रस्त्यांचे काम नव्याने समाविष्ट करून त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

यामध्ये शिरोली येथील शिरोली शाळा ते महाडीक बंगला येथे नवोन भुयारी मार्ग, मंगरायाचीवाडी येथील भुयारी मार्गाचा उंची व रुदी वाढविण्यास मजुरी, किणी हायस्कूल ते माळी वसाहत नवीन भुयारा मार्ग, घुणकी येथे वारणा नदीच्या पुराचे पाणी पास होण्यासाठी पूर्वीचे तोन व नवीन तीन वॉटर अंडरपासचे मंजुरी,त्याचबरोबर घुणका ओढ्याच्या पुलापासून महामार्गाच्या दोन्ही बाजूस शेतकऱ्यांच्या शेतीमाल व ऊस वाहतुकीसाठी नवीन वारणा नदी पुलापर्यंत नवीन सेवा रस्ता , कणेगाव फाटा येथे नवीन बायपास रस्ता त्याचप्रमाणे गोकुळ शिरगाव येथील छोटा भुयारी मार्ग तर उजळाईवाडी व सरनोबतवाडी येथील नवीन बायपास मार्गास नव्याने मंजुरी मिळाली असल्याची माहिती खासदार माने यांनी दिली.