कोल्हापूर : कोल्हापूरच्या मयूर प्रकाश कुलकर्णी निर्मित, दिग्दर्शित ‘स्वीट मून’ या लघुपटाला चीनमधील शांघाय येथे ‘शांघाय इंटरनॅशनल शॉर्ट वीक’ मध्ये उत्कृष्ट प्रायोगिक लघुपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे कोल्हापूरचं नाव कलाक्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहे.
या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये जगभरातील 70 देशांमधील तेराशे हुन अधिक दर्जेदार लघुपटाचे सादरीकरण झाले. या सर्वांमध्ये ‘स्वीट मून’ हा मयूर कुलकर्णी यांनी बनवलेला लघुपट प्रायोगिक विभागात सर्वोत्कृष्ट ठरला. ‘स्वीट मून’ लघुपटाने इंग्लंड मधील ‘एलिवेशन फिल्म फेस्टिव्हल’, ब्राझीलमध्ये ‘ओथर फिल्म फेस्टिव्हल’ अशा अन्य देशातील महोत्सवातही पुरस्कार पटकावले आहेत. भारतातील कोलकत्ता येथे झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल मध्ये ‘स्वीट मून’ ला उत्कृष्ट मूकपट म्हणून गौरविण्यात आले आहे.