कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे कोरोची येथील जैन मंदिर येथे जैन समाज हॉलचे कैची बसवण्याचा शुभारंभ डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
यावेळी, बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवडे यांनी आमदार प्रकाश आवडे यांच्या सहकार्यातून कोरोची गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण लागेल ते सहकार्य करणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीत ताराराणी पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.यावेळी श्रावक कमिटी, बांधकाम कमिटी, श्रावक व महिला मंडळ उपस्थित होते.