धाराशिव: विधानसभा निवडणुक जवळ येईल तसे महायुती आणि महाविकास आघाडी सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसंच राज्यात इतर छोट्या पक्षाकडून ही तिसऱ्या आघाडीचा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे . संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “मनोजरांगे पाटील यांची मी घेतलेली भेट ही त्यांना तिसऱ्या आघाडी येण्याची विनंती करण्यासाठी होती. अशी माहिती त्यांनी धाराशिव येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे.”
मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित काम करायला हवं मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या आघाडीत यावं, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी त्यांची भेट त्यासाठीच घेतली होती. असे संभाजीराजे यांनी सांगितल आहे.