कोल्हापूर:माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली, करवीर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरूच आहेत. कार्यकर्ते नरके यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज चिंचवडे तर्फ कळे येथील दीपक पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या कार्याने आम्ही प्रभावित झालो आहोत. ते आमदार असताना प्रचंड प्रमाणात विकासाची कामे झाली. मात्र गेली पाच वर्षे विकासाला खीळ बसली. करवीर विधानसभा मतदार संघ विकासाच्या बाबतीत या पाच वर्षात खूपच मागे पडला. आमदार चंद्रदीप नरके यांनी आमदार असताना तर प्रचंड कामे केलीच पण, गेली पाच वर्षे सत्ता नसताना देखील त्यांनी मतदार संघाशी कधी संपर्क तुटू दिला नाही.
कित्येक रुग्णांना त्यांच्याकडून मदत झाली आहे. कुणी अडचणीत असेल तर गट-तट, पक्ष न पाहता काम करणारे नेतृत्व म्हणजेच चंद्रदीप नरके साहेब. त्यांच्या प्रयत्नांतून कोट्यवधींचा निधी मतदार संघात येतो आहे. त्यामुळे करवीर विधानसभा मतदार संघाचा, गेली पाच वर्षांचा विकासाचा दुष्काळ जर दूर करायचा असेल तर माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतेतृत्वाला पर्याय नाही. म्हणूनच चिंचवडे तर्फ कळे येथील आम्ही शेकडो कार्यकर्ते, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेत्रत्वाखाली शिवसेनेत आलो आहोत, अशा भावना गटनेते दीपक पाटील यांनी व्यक्त केल्या.
दीपक सारखा कार्यकर्त्यांना मी नेहमीच बळ देत आलो आहे आणि इथून पुढे देखील देईन. दीपकचे समाजिक क्षेत्रातील काम अतिशय कौतुकास्पद असून, चिंचवडे आणि परिसरातील विद्यार्थी, रुग्ण, गोर-गरीब कुणी असेल, त्यांच्या मदतीसाठी दीपक सर्वात पुढे असतो. दीपक आणि त्यांचे सर्व सहकारी आज माझ्यासोबत जोडले जात आहेत, याचा आनंद आहे. त्यांच्या प्रत्येक विधायक कार्यात मी सहभागी असेन, दीपक यांना माझे पूर्ण पाठबळ असेल, असे कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.
गटनेता दीपक सर्जेराव पाटील, माजी उपसरपंच अर्जुन शंकर कोल्हे,जय भवानी सेवा संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आनंदा कृष्णा पाटील, माजी सरपंच सरदार शामराव पाटील, युवराज दाजी पाटील, पंडित बापू देसाई, अमर एकनाथ तडुलकर, कुंडलिक श्रीपती नाईक, युवराज बाबुराव तडुलकर, संभाजी हारणे, बाजीराव गणपती पाटील, दगडू बापू पाटील, प्रकाश आनंदा पाटील, संजय बाबुराव तडुलकर, अनिकेत कांबळे, आदित्य पाटील, बाबुराव कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज चंद्रदीप नरके गटात जाहीर प्रवेश केला
याप्रवेशासाठी संजय कुदळे, चंद्रकांत पोवार , एस. के. पाटील, राजेंद्र दिवसे (नागदेवाडी), अश्विन वरुटे, संदीप देसाई खुपिरे, रवी पाटील (काटेगाव सरपंच) आदींचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी कुंभी-कासारी सहकारी बँकेचे संचालक विलास देसाई, कोजिमाशीचे संचालक दीपक पाटील, देवराज नरके व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.