कोल्हापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडून बँकांना पत्राद्वारे खालील प्रमाणे आदेश देण्यात आले आहेत. त्या संदर्भात राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेनेच्या वतीने सिद्धी रांगणेकर, पूजा भोर, नम्रता भोसले, पूजा कामते, राहुल चव्हाण, रियाज भाई बागवान, गणेश रांगणेकर, यांच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र बँक, ऑफ इंडिया, आरबीएल बँक, यांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे पत्र देण्यात आले.
या पत्रात थकीस कर्जाच्या बदल्यात ही रक्कम जमा करता येणार नाही,कुठल्याही थकबाकीच्या बदल्यात रक्कम काढण्यास नकार देऊ नये, बँकेचे प्रलंबित कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बँक खाते तात्काळ सुरू करून लाभार्थ्यांना त्वरित रक्कम उपलब्ध करून द्यावी
असे नमूद करण्यात आले आहे.