कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
हातगणंगले तालुक्यातील येथील ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने गणेश उत्सवाच्या निमित्ताने सर्व बाजारपेठ व गावातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणाची स्वच्छता करण्यात आली असून बऱ्याच दिवसांनी झालेल्या स्वच्छतेमुळे कुंभोज ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे. परिणामी बाजारपेठेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठला असून त्याची दुर्गंधी पसरत असल्याची वृत्तही काहीनी प्रसिद्ध केले होते.
त्या अनुषंगाने सदर घटनेची दखल घेत ग्रामपंचायत कुंभोज आणि एसटी स्टँड परिसर बाजारपेठ दीपक चौक आंबेडकर चौक, मसुदी कट्टा परिसरातील स्वच्छता करून घेतली असल्याचे चित्र दिसत असून याबाबत नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. परिणामी आगामी गणेशोत्सवाच्या आगमनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कुंभोज व हातकणंगले पोलीस स्टेशन यांच्या वतीने कायदेशीर चौकटीत बसून नियोजन करण्यात आले असून त्यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व हातकणंगले पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या सहकार्याने मंडळांच्या बैठकीचे आयोजन करून गणेशोत्सव शांततेत संपन्न करण्याचे त्याचप्रमाणे आगमन व विसर्जन मिरवणुकीची निमावली कडक करण्यात आली असल्याचे चित्र दिसत आहे.