संतापजनक ! 75 वर्षाच्या वृद्धेवर युवकाने केला बलात्कार

सांगली : वाळवा तालुक्यातील एका गावात 75 वर्षीय वृद्धीवर तरुणाने बलात्कार केल्याचा संताप जनक प्रकार घडला ही घटना शनिवारी उघडकीस आली. संतप्त झालेल्या नागरिकांनी त्यास पकडून बेदम चोप दिला. सोमनाथ चंद्रकांत शिंदे (28) या संशयताला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

वृध्दा ही पुतण्याच्या कुटुंबाबरोबर राहत होती.शनिवारी दुपारी घरी कोणी नसल्याचे पाहुन संशयित घरात शिरला.त्याने वृद्धेवर बलात्कार केला.तिने आरडाओरडा केल्यावर शेजारील महिलांनी वृध्देच्या घराकडे धाव घेतली.त्यानी सोमनाथला पकडून चोप दिला.
सहायक पोलिस निरिक्षक राहुल घुगे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत सोमनाथ ला ताब्यात घेतले.वृध्देला इस्लामपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

🤙 9921334545