नवरदेवाची सव्वा चार लाखांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद: राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथील घटना

कोल्हापूर : आजकाल लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातील मुली लग्नासाठी शोधल्या जातात परंतु लग्न केल्यानंतर ही टोळी दागिने, पैसे घेऊन पलायन करण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. अशीच एक घटना राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथे घडली. फसवणूक करणाऱ्या तिघांना राधानगरी पोलिसांनी काल अटक केली.

 

 

मिळाली माहिती अशी , रमेश बारड यांचा विवाह राधा देशमुख उर्फ सोनाली कोल्हार (रा. मोहोळ, जि. सोलापूर ) 26 एप्रिल रोजी झाला. यावेळी सुवर्णा अमोल बागल,अमोल शहाजी बागल हे दाम्पत्य एजंट म्हणून होते. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नववधूसह तिघे हि घरातून पळून गेले. जाताना त्यांनी दागिने साड्या आधी सुमारे 4 लाख १६ हजाराराचा मुद्देमाल घेऊन पसार झाले .फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पांडुरंग बारड यांनी राधानगरी पोलिसात तक्रार दिली होती. या तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं.

याच टोळीने मानेवाडी येथे पावणे दोन लाखाला गंडा घातला होता याचा तब्बल ४ महिन्यांनी छडा लागला . पोलीस निरीक्षक संतोष गोरे उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी नववधूसह दोघांना ताब्यात घेतले.