नालासोपारा: एका अल्पवयीन मुलीचा लैंगिग छळ करणाऱ्या शिक्षकाला ब दम चोप देऊन नागरिकांनी गावातून धिंड काढण्याची घटना मनवेल पाडा या परिसरात घडली विरार पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
खाजगी ट्युशन क्लास मध्ये शिकणाऱ्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला मनवेल पाड्याच्या सह्याद्री नगर मधील शिक्षक प्रमोद मोर्या हा लैंगिग छळ करत होता . त्यामुळे ती मुलगी दोन दिवस ट्युशनला गेली नव्हती घरच्यांनी याबद्दल विचारले असता, तिने घरच्यांना हा धक्कादायक प्रकार सांगितला. यानंतर मुलीचे पालक आणि परिसरातील संतप्त नागरिक ट्युशन मध्ये गेले व आरोपी शिक्षकाला मारहाण करून रस्त्यावरून त्याची धिंड काढली. आरोपी शिक्षक हा या मारहाणीत रक्त बंबाळ झाला होता. या शिक्षकाने तीन ते चार अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.नागरिकांनी आरोपी शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे