कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील
काँग्रेस पक्षाच्या वतीने खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी आज बुधवार 28 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आलं. शहरातील 81 प्रभागाच्या ठिकाणी एकाच वेळी हे आंदोलन करण्यात आलं. यामध्ये नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रास्ता रोको करण्यात आला नाही तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंला निदर्शने केली. या आंदोलनात जास्तीत जास्त कोल्हापूरकरांनी आपापल्या प्रभागामध्ये होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, रस्त्यांच्या दुर्दशेमुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्डे मुजविण्यासाठी महापालिकेकडे वारंवार मागणी केली आहे. यावर तत्काळ कार्यवाही होत नसल्याने हे जन आंदोलन करण्यात येत आहे .
प्रभाग क्र 26 कॉमर्स कॉलेज भागातील गणी अजरेकर,सदानंद दिगे ,समीर बागवान,अर्जुन माने,राजू जमादार,विकी पांडत,अमोल चांदुगडे, नजीर बागवान,शाकिर शेख ,निलेश भोसले ,मुस्तफा भेलवाले,गुंड्या महात , k g बागवान,अब्दुल रहीम बागवान समाधान काळे, विकी कांबळे व ज्येष्ठ कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. 28/8/2024 रोजी सकाळी 9 वाजता बिंदू चौकमध्ये आंदोलन करण्यात आले .
यावेळी
”आम्ही कर भरतोय रस्ता द्या”
“आम्ही घरफाळा भरतोय रस्ता द्या”
अश्या घोषण्यांनी बिंदू चौक परिसर दणाणला होता तसेच खड्यांचा भोवाती रांगोळी व फुले अंतरून प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यात आले.