कोल्हापूर : कौलव चा एमआयडीसी प्रकल्प त्वरित रद्द करावा या मागणीचा ठराव कौलव येथील झालेल्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. राज्य शासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता,ग्रामस्थांनी केलेला विरोध डावलून एमआयडीसी प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. शासनाच्या या निर्णयाला ग्रामस्थांनी विरोध दाखवला आहे. यासाठी निवेदन, साखळी, उपोषण, बेमुदत उपोषण आदी मार्गाने आंदोलन सुरू आहे ग्रामसभेत ग्रामस्थांनी एमआयडीसी प्रकल्प त्वरित रद्द करावा अशा मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला.प्रकल्प रद्द न केल्यास टप्प्याटप्पाने आंदोलन तीव्र करू असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी या सभेला भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले ,धैर्यशील पाटील, माजी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, चंद्रकांत पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वास पाटील ,उपसरपंच सरिता पाटील,सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.