कोल्हापूर: युवाशक्तीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधत टीका केली. धनंजय महाडिक म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचे सहा आमदार ,महापालिका, जिल्हा परिषद,गोकुळ, जिल्हा बँक, सगळी सत्ता त्यांच्याच हातात आहे तरीसुद्धा कोल्हापूरचा विकास झालेला नाही. शहरातील रस्ते, कचरा प्रश्न तसाच आहे .“त्यांनी केलेले काम दाखवा तीन लाखाचे बक्षीस मी देतो” अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. आम्ही विमानतळ, रेल्वे स्थानक ,विस्तारीकरण, बास्केट ब्रिज या माध्यमातून जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास करीत आहोत. लवकरच महापालिकेला शंभर ई बसेस मिळतील.मात्र माजी पालकमंत्र्यांना आम्ही केलेली कामे दिसत नाहीत. विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून द्या, असे आवाहन धनंजय महाडिक यांनी केले.