निनावी पत्राद्वारे ‘के पी पाटील’ यांच्या विरोधात शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली तक्रार;

कोल्हापूर: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते के पी पाटील हे महाविकास आघाडीमध्ये येण्यास उत्सुक आहेत. या विरोधात मतदारसंघातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निनावी पत्राद्वारे तक्रार केली आहे.

 

 

या तक्रारी मध्ये गोकुळ संघ, बाजारसमिती, बिद्री कारखाना या निवडणुकीत मतदार संघातील शिवसैनिकांना के पी पाटील यांनी कसे डावललं हे सांगून त्यांना पक्षात न घेण्याची विनंती शिवसैनिकांनी केली आहे. पक्षासोबत गद्दारी केलेल्या आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यावरही या पत्रात टीका केली आहे

के पी पाटील यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी निमंत्रण दिल्याचे समजल्यावर हे पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात असे म्हटले आहे की, के पी पाटलांना दिलेले निमंत्रण ऐकून खूप वाईट वाटलं. अनेक वर्षापासून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही लढतोय, अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरतोय, तर मग आमचा विचार कधी होणार? असा प्रश्नही यात विचारला आहे.
हरलो तरी चालेल पण निष्ठावंतला घेऊन लढू या असे आव्हाने यात केले आहे.

🤙 9921334545