शिवरायांच्या पुतळ्याचा चबुतरा बांधणाऱ्या कोल्हापूरच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल!

कोल्हापूर:  राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम व या कामाच्या सल्लागार पदाची जबाबदारी कोल्हापुरातील डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याप्रकरणी डॉक्टर पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे

 

 

जयदीप आपटे या कारागिराला शिवरायांच्या पुतळ्याचे काम देण्यात आलं होतं. या चबुतरा बांधकामाच्या स्ट्रक्चरल कन्स्लटंट म्हणून डॉ. चेतन पाटील यांना काम देण्यात आलं होतं. चेतन पाटील हे कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील रहिवासी आहेत त्यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. दरम्यान जुना राजवाडा पोलिसांच्या मदतीने मालवण पोलीस हे डॉक्टर चेतन पाटील यांच्या शिवाजी पेठेतील घरी पोहोचले. वेताळ तालमीच्या परिसरात डॉक्टर पाटील यांचे घर आहे. त्यांच्या कुटुंबियाकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली त्यावेळी डॉक्टर पाटील घरी नसल्याचे सांगण्यात आले

🤙 9921334545