महिला मदतनीशासी केलेल्या गैरवर्तनाच्या रागातून, ग्रामस्थांनी मुख्याध्यापकाला चोपले;

कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील शाळेमध्ये मदतनीस महिलेशी गैरवर्तन केल्याबद्दल ग्रामस्थांनी मुख्याध्यापकास मारहाण केली. मारहाण केलेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले. जमाव वाढल्याचे पाहून मुख्याध्यापकांनी शाळेतून पलायन केलं.

 

मिळालेली माहिती अशी की, मुख्याध्यापकाच्या गैरवर्तनाबाबत दोन दिवसांपूर्वी या महिलेने ग्रापंचायत सदस्य कडे तक्रार केली होती. त्यानंतरत्या मुख्याध्यापकाला समज देण्यात आला होता, मात्र त्याच दिवशी शाळा सुटल्यानंतर मुख्याध्यापकांनी पुन्हा त्या मदतनीस व एका शिक्षकेशी गैरवर्तन केले.
त्यामुळे काल सकाळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक शाळेत एकत्र आले व सर्वांनी मुख्याध्यापकाला या प्रकरणाबाबत चांगलेच धारेवर धरले जमावातील काहींनी मुख्याध्यापकांच्या अंगावर धावून जात चोप दिला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी पलायन केले. याबाबत शहापूर पोलीसांनी महिलेकडे विचारपूस केली. मात्र महिलेने तक्रार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

🤙 9921334545