कोल्हापूर: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल 26 ऑगस्ट रोजी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. कोट्यवधी रुपये खर्च करून उभा करण्यात आलेला हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याने शिवप्रेमी मध्ये नाराजीचा सूर आहे.
पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा पुतळा कोसळल्याची स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला असं सरकारचे म्हणणं आहे.परंतु शिवाजी महाराजांनी उभा केलेले गड, किल्ले हे अनेक वर्ष जशे च्या तसे उभे आहेत. त्यांना अजूनही काही झालेलं नाही, मात्र महायुती सरकारने उभारलेला छत्रपतींचा हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला. या घटनेची चौकशी करून आरोपींवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी केली.