डेटिंग App मुळे होतेय, तरुणांची फसवणूक

मुंबई: डेटिंग App मुळे फसवणुकीच्या घटना रोज घडत आहेत अनेक मुलं, मुली या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. असाच एक प्रकार मुंबईत समोर आला आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी डेटिंग फसवणूक उघडकीस आली आहे. ही छोटी टोळी नाही तरी पूर्ण क्लब आहे जिथे मुलांची लूट होत आहे.

 

मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील फसवणुकीची घटना समोर आलीय, यामध्ये मुलगी टेंडर आणि बबल यासारख्या डेटिंग App वर संपर्क साधते संवाद सुरू झाल्यानंतर ती भेटायला कॉल करते आणि अंधेरीच्या जवळ एका ठिकाणी क्लब मध्ये बोलावून घेते.
क्लब मध्ये ती महागड्या वाईनची ऑर्डर देते. आणि ती प्याल्यानंतर तिच्याकडे पैसे नाहीत असं सांगून ती निघून जाते. जेव्हा बिल मुलांसमोर येतं तेव्हा त्यांना धक्का बसतो कारण क्लबचे बिल 25000 ते 65 हजार रुपये किंवा त्याहून अधिक आहे अस दिसत. या क्लब मध्ये दररोज कोणाची न कोणाची फसवणूक होत आहे.   याबाबत पोलिसांना कळवलं मात्र पोलिसांनी यावर कोणतीही फकठोर कारवाई केली नसल्याचे म्हटले आहे.

🤙 9921334545