महाविकास आघाडीचे हाताला काळी फीत बांधून आंदोलन : शरद पवार आंदोलनात सहभागी

पुणे:बदलापूर येथे शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाला या अत्याचाराचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. आज काढण्यात येणारा बंद रद्द करण्यात आला आहे, त्याऐवजी महाविकास आघाडी कडून मुक आंदोलन केले जात आहे.

 

तोंडाला मास्क आणि हाताला काळ्या फिती बांधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य आजी-माजी आमदार महापौर कार्यकर्ते यांचा पुण्यात भर पावसात मुक आंदोलन सुरु आहे.

🤙 9921334545